आंध्रप्रदेश बनणार ३ राजधान्या असणारं एकमेव राज्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । चंद्राबाबू नायडू यांनी दाखवलेला तीव्र विरोध मोडून काढत आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजुर करण्यात आले. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं होतं. आवाजी मतदानानं हे विधेयक सोमवारी मंजुर करण्यात आलं. या विधेयकानुसार विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी, अमरावती विधीमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.

अमरावतीविषयी कोणतीही आप-परभवाची भावना मनात नसून प्रशासकीय सोयरीकतेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं वाय.एस जगनमोहन रेड्डी यांच्याकडून सांगण्यात आलं.

विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधला. नायडू यांना जे हवं होतं तेच केलं असल्याचं ते म्हणाले. विकास केवळ एका स्थानापुरता मर्यादित नसावा, असं शिवरामकृष्ण समितीने सोपवलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यांनी समितीच्या अहवालाची दखल घेतली नसल्याचंही रेड्डी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास मंत्रालयातील या नंबरवर संपर्क साधा