क्रिकेट मॅच मुळे झाला रेल्वे अपघात; धक्कादायक माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 29 ऑक्टोबर 2023 रोजी आंध्र प्रदेशात घडलेल्या रेल्वे अपघाताबद्दल (Andhra Pradesh Train Accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट चालू गाडीत मोबाईल वर क्रिकट सामना (Cricket Match) बघत होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष्य विचलित झालं आणि हा भीषण अपघात झाल्याचे समोर आलं आहे. भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेटचे वेड माणसाच्या जीवनावर कस उठलं हीच गोष्ट यातून निदर्शनास येतेय.

कसा झाला होता अपघात-

29 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता रायगडा पॅसेंजर ट्रेनने आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली. या अपघातात 14 लोकांना आपला प्राण गमवावा लागला तर 50 हून अधिक जण जखमी झाले. रेल्वे मंत्री वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी शनिवारी आंध्र रेल्वे अपघाताचा उल्लेख करताना भारतीय रेल्वे ज्या नवीन सुरक्षा उपायांवर काम करत आहे त्याबद्दल बोलत होते.

अश्विनी वैष्णव म्हणाले, आंध्र प्रदेशमध्ये अलीकडेच रेल्वे अपघाताची घटना घडली. कारण ट्रेन मधील लोको पायलट आणि सह-पायलट दोघेही क्रिकेट सामना पाहत होते आणि त्यांचे लक्ष विचलित झाले. परंतु आता आम्ही अशी एक सिस्टीम आणणार आहोत, जी अशा परिस्थितीची त्वरित माहिती घेईल. आणि लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट दोघेही ट्रेन चालवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत याची खात्री करू शकतील. आम्ही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत राहू. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही त्यावर उपाय शोधतो,” असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.