Android यूजर्स, सावधान!! एका क्लिकने बँक अकाउंट होईल रिकामं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अँड्रॉइड युजर्सची संख्या कोरडोमध्ये आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. आणि जवळपास सर्व मोबाईल मध्ये अँड्रॉइड व्हर्जन पाहायला मिळते. परंतु याच Android यूजर्स साठी आता एक धोक्याची घंटा आहे. मोबाईल सुरक्षिततेच्या तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल इशारा दिला आहे. Android XLoader असे या मालवेअरचे नाव असून हे इतकं धोकादायक आहे कि नुसत्या एका क्लिकवर तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकते.

Android XLoade हा मालवेअर मोबाईल मधील अतिशय महत्त्वाच्या अशा डिटेल्स पर्यंत पोचतो. हे एसएमएसमध्ये सुद्धा एंट्री करते. आणि त्याच काम करत राहते. रिपोर्ट्सनुसार, ब्लीपिंग कंप्यूटर ने McAfee चा हवाला देत म्हंटल की, हे मालवेअर अँड्रॉइड यूजर्स साठी अतिशय धोकादायक मानलं जाते. Android XLoader मालवेअर अतिशय सहजपणे तुमच्या मोबाईल वर हल्ला करू शकतो. यामध्ये, इंफेक्टेड वेबसाइट URL सह एक मेसेज येतो. दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर एक APK फाइल मोबाईल मध्ये इंस्टाल होते. हि लिंक साइडलोडिंग तंत्र वापरून दुसऱ्या स्त्रोताकडून ॲप इंस्टाल करते. महत्वाची गोष्ट म्हणजे फक्य मेसेजच नव्हे तर अन्य मार्गाने सुद्धा हा मालवेअर मोबाईल मध्ये प्रवेश करू शकतो. आणि मोबाईल मधील अँप ट्रॅक करू शकतात.

McAfee ने या लेटेस्ट थ्रेड बद्दल आधीच गुगलला कळवलं आहे. यानंतर कंपनीने हा मालवेअर लगेच हटवला सुद्धा परंतु, प्ले स्टोअरसोडून बाकी ठिकाणी उपलब्ध असलेल्या ॲप्सवर Google नियंत्रण करू शकत नाही. Google तुमचे डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी Play Protect सक्षम करण्याची शिफारस करते. हे तुम्हाला अनेक धोक्यांपासून वाचवण्याचे काम करते.