अंगणवाडी सेविकांना मिळणार शिक्षकाचा दर्जा; आदिती तटकरे यांचे आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता इतर शिक्षकांप्रमाणेच अंगणवाडीतील सेविकांना देखील वेतनासह पूर्व प्राथमिक शिक्षकाचा दर्जा मिळणार आहे. कारण, की अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवू आणि त्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आमदार कपिल पाटील यांना दिले आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी दिली आहे.

बुधवारी कपिल पाटील यांची अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षक भारती शिष्टमंडळ आणि आदिती तटकरे यांच्यासह महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आदिती तटकरे यांनी 3 हजार मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना वैद्यकीय उपचार देण्याचे त्यांनी मान्यता दिली.

त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, मुख्य म्हणजे, अंगणवाडी सेविकांना दर्जेदार मोबाईल देण्याचे व पोषण आहारामध्ये दर्जा वाढवण्याचे देखील आश्वासन तटकरे यांनी आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर, अंगणवाडी सेविकांच्या हेल्थ इन्शुरन्सचा खर्चही शासन करणार याला तटकरे यांनी मान्यता दिली. यामुळेच आता अंगणवाडी सेविकांना देखील सर्व सोयी सुविधांचा लाभ घेता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.