हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Angelo Mathews Retirement । रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर आणखी एका बड्या खेळाडूने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. श्रीलंकेचा अष्टपैलु खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मॅथ्यूज १७ जूनपासून गॉलमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.त्यानंतर तो कधीच पांढऱ्या जर्सीत दिसणार नाही, परंतु एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मात्र तो खेळताना दिसेल. आज अचानकपणे कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेत मॅथ्यूजने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
निवृत्तीबाबत बोलताना अँजेलो मॅथ्यूजने ट्विट करत म्हंटल, माझ्या प्रिय मित्रांनो, आता खेळाच्या सर्वात मोठ्या स्वरूपाला, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेल्या १७ वर्षांपासून श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान आहे. राष्ट्रीय जर्सी घालताना वाटणाऱ्या देशभक्तीला आणि सेवेच्या भावनेला काहीही हरवू शकत नाही. मी माझे सर्वस्व क्रिकेटला दिले आहे आणि त्या बदल्यात क्रिकेटने सुद्धा मला सर्व काही दिले. आज मी जो कोणी आहे तो फक्त क्रिकेट मुळे आहे. मी खेळाचा आणि श्रीलंका क्रिकेटच्या हजारो चाहत्यांचा आभारी आहे जे माझ्या कारकिर्दीच्या अडचणीच्या वेळीही माझ्या पाठीशी उभे राहिले. जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा माझा शेवटचा कसोटी सामना असेल. Angelo Mathews Retirement
— Angelo Mathews (@Angelo69Mathews) May 23, 2025
मॅथ्यूजची कसोटी कारकीर्द कशी राहिली? Angelo Mathews Retirement
अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलु खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने गॅल येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा, यांच्या निवृत्तीनंतर मॅथ्यूजने श्रीलंका क्रिकेटची धुरा सांभाळली होती. त्याने श्रीलंकेचे कर्णधारपद सुद्धा भूषवलं. बॅटिंग ऑल राऊंडर असलेला मॅथ्यूज उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीची करायचा. अँजेलो मॅथ्यूज ने श्रीलंकेसाठी ११८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४४.६२ च्या सरासरीने ८,१६७ धावा केल्या आणि ३३ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने १६ शतके आणि ४५ अर्धशतके ठोकली आहेत. महत्वाची बाब म्हणजे मॅथ्यूजने ३४ कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचे नेतृत्वही केले आहे.




