औरंगाबाद – श्रावण मासानिमित्त प्रतीकात्मक कावड यात्रा काढल्यानंतर खडकेश्वर येथील महादेव मंदिरात पाठीमागच्या दरवाजाने प्रवेश करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर सिटी चौक व बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कावड यात्रेच्या निमित्ताने गर्दी जमाविण्यात आली होती. तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात आली होती. तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांना वेगळे नियम आणि सर्वसामान्य जनतेसाठी वेगळे नियम अशी टीका देखील विरोधकांनी केली होती.
याछबी दरम्यान आता कावड यात्रा काढून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आ. दानवे, राजेंद्र दानवे, विश्वानाथ राजपूत, सोमनाथ बोंबले, किशोर नागरे, गोपाल कुलकर्णी, विजय वाघचौरे, संजय हरणे, संतोष जेजुरकर, यांच्यासह इतरांवर सिटी चौक व बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले .