व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीकडून पत्नीची हत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीने कुऱ्हाडीने घाव घालून आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आहे. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू (Murder) झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नटवाडे गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नटवाडे गावातील आरोपी नवऱ्याने एका शुल्लक कारणावरून स्वतःच्या बायकोवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा खून (Murder) केल्यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून आरोपी नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील लोकांना उपजिल्हा रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह (Murder) ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मृत महिलेच्या माहेरच्या लोकांकडून घेण्यात आली आहे.

सासऱ्याची पोलिसात तक्रार
मृत महिलेचा पती रामलाल हजाऱ्या पावरा याने तपकिर मागितल्याने तपकीर दिली नसल्याच्या रागातून त्याने पत्नी गीताबाई पावरा हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या (Murder) केली असल्याची तक्रार मृत महिलेचे वडिल मुलसिंग आवा पावरा यांनी शिरपुर पोलीस ठाण्यात दिली आहे. नटवाडे या गावात सहा महिन्यात खूनाची (Murder) ही दुसरी घटना घडली आहे. तर धुळे जिल्ह्यात पंधरा दिवसात ही तिसरी घटना घडली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर