रणवीर कपूरचा ‘Animal’ पडला ‘Tiger 3’ वर भारी; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात. त्यातले काही हिट होतात तर काही फ्लॉप होतात. मागील काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. असे असताना हा चित्रपट सर्वात आधी अमेरिकेत प्रदर्शीत करण्यात आला. अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली असून सलमान खानच्या ‘Tiger 3’ चा रेकॉर्ड मोडला आहे.

पहिल्याच दिवशी 5.40 कोटींची कमाई

अमेरिकेत हे दोन्ही चित्रपट प्रदर्शीत झाले असून रिपोर्टनुसार रणबीर कपूर सलमान खानवर भारी पडला आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाने एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती. तर ‘अ‍ॅनिमलने’ पहिल्याच दिवशी तब्बल 5.40 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘टायगर 3’ चा रेकॉर्ड मोडला गेला आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे.

‘अ‍ॅनिमल’ चे 1154 शो

रणबीर कपूरच्या चित्रपटाचे अमेरिकेत एकूण 1154 एवढे शो झाले आहेत. त्यातून ही कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच शोमध्ये एक मिलियन पेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे भारतात या चित्रपटाची चांगलीच क्रेज निर्माण झाली आहे.अमेरिकेत सलमान खानच्या चित्रपटाला मागे टाकत रेकॉर्ड तोड कमाई केल्यानंतर आता भारतातही ‘अ‍ॅनिमल’ पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरणार असल्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची एकूण साडे सात लाख तिकीट विकली गेली आहेत.

चित्रपटास मिळाले ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट

रणबीर कपूरच्या या चित्रपटास भारतातील सेन्सॉर बोर्डाने ‘A’ दर्जाचे सर्टिफिकेट दिले आहे. ज्यामध्ये केवळ ‘अडल्ट’ असलेले लोकच हा चित्रपट पाहू शकतात. या चित्रपटात अत्यंत कमी कालावधीत फेमस झालेली रश्मीका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे आहेत. त्यामुळे कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी सारखा हाही चित्रपट सुपरहिट ठरतो का? हे पाहणे गरजेचे आहे.