काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीपूर्वी मतदारयादी जाहीर करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठीची मतदार यादी सार्वजनिक करा अशी मागणी दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जी-23 या नाराज गटाचे सदस्य आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत मतदारयादी जाहीर केली जाते. त्यामुळे मतदार यादी संकेतस्थळावर टाकून मतदारांना ईमेलद्वारे मतदार यादी देण्यात यावी. वेबसाईटमध्ये काही अडचण असल्यास ती ईमेल करावी. निवडणुकीची पारदर्शकता राखण्यासाठी आणि काँग्रेसमधील सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास बहाल करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी मतदार यादी सार्वजनिक करण्याचे किंवा इच्छुक उमेदवाराला ई-मेल करण्याचे निर्देश द्यावेत.

यापूर्वी शशी थरूर आणि मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठीची मतदार यादी जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली होती. कोणालाही निवडणूक लढवायची असेल तर त्याच्याकडे मतदारांची माहितीच नसेल. मतदारयादी शिवाय निवडणूक निष्पक्ष कशी होऊ शकते, असा सवाल मनीष तिवारी यांनी उपस्थित केला होता.