शिंदे सरकारकडून लेक लाडकी योजनेची घोषणा; मुलींना करणार लखपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य बैठक पार पडली आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याचा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्याची मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे. तसेच, फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय

1) राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील.

2) तसेच, सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण आणि मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

3) त्याचबरोबर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला आहे.

4) पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार हा निर्णय आजच्या बैठकीत घेतला गेला आहे.

5) फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय झाला आहे.

6) भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे