Union Budget 2024: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं?? एका क्लीकवर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस भारतीय अर्थ व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने, गरीब, महिला, तरूण वर्गासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त भर दिला आहे. त्यामुळेच आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेण्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

आज अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करताना आपल्या भाषणात निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, दरवर्षी पीएम किसानमधून 11.8 कोटी निधी शेतकऱ्यांना देण्यात येतो. तसेच, 4 कोटी शेतकऱ्यांना फसल विमा योजनेतून पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. कृषी स्टार्ट ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यास प्रोत्साहन करण्यात येत आहे. इथून पुढे, शेतकऱ्यांचा शेतमाल टिकून राहावा यासाठी जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर, “दूध उत्पादकांसाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशन, लाईव्ह स्टॉक मिशन अशा योजनांना बळ देण्यात येईल. नॅनो युरियाच्या वापरास प्रोत्साहन दिल्यास हवामान बदलात त्याचा वापर परिणामकारक ठरेल” अशी माहिती निर्मला सीतारमण (Union Budget 2024) यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी घोषणा (Union Budget 2024)

  • पुढील काळात 3 लाख कोटींचा व्यापार कृषी क्षेत्रातून होईल.
  • जास्त प्रमाणात कृषी क्षेत्रात खाजगी आणि सरकारी गुंतवणूक करण्यात येणार.
  • तेलबियांमध्ये देश आत्मनिर्भर होण्यावर भर देणार.
  • 80 कोटी जनतेला मोफत धान्य वाटप होणार.
  • मुद्रा योजनेतून 12000 कोटींचे वाटप करण्यात येणार.