औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आज मध्यवर्ती विभागीय कार्यालयासमोर ‘जवाब दो आंदोलन’ करण्यात आले. २०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
२०१९ मध्ये भरती झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी बऱ्याच दिवसापासून वारंवार निवेदनाद्वारे प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी कोणतेही प्रतिउत्तर आले नाही. म्हणून, एसटी कर्मचाऱ्यांनी आज विभागीय कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन केले.
प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आज जे आंदोलन शांत पध्दतीने केले आहे. ते पुढे जाऊन उग्र स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. प्रशासनाने आमचे प्रश्न मार्गी लावावे आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करून घ्यावी,अशी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात अमोल जाधव, रवींद्र चव्हाण, राम तुपे आदींसह आंदोलनात ५० ते ६० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.