Apaar Card | अपार कार्ड हे आता देशातील विद्यार्थ्यांची एक नवीन ओळख झालेली आहे. त्यात एक राष्ट्रांनी एक ओळखपत्र या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला आहे. आपल्या देशात आत्तापर्यंत २५ कोटी अपार कार्डचे वाटप झालेले आहे. याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे काळ विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी पडणार आहे. आता हे कार्ड कुठे तयार करायचे तसेच फायदा काय आहे हा अनेकांना पडलेला आहे आता त्याची माहिती आपण सविस्तर पाहूया.
नवी दिल्लीमध्ये नुकतेच अपार कार्डविषयी राष्ट्रीय परिषद पार पडली आहे. यावेळी येणाऱ्या अनेक योजना राबविण्यात विषयी शिक्षकांसाठी इतरांच्या प्रशिक्षणाविषयी उहापोह झाला. यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत 2020 ही योजना आलेली आहे. यामध्ये एक प्रकारचा शैक्षणिक विद्यार्थ्यांचा बायोडाटा असणार आहे.
काय आहे अपार कार्ड? | Apaar Card
अपार कार्डमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्रीडा तसेच शिष्यवृत्ती बद्दलची माहिती असणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना कोण कोणती बक्षीस मिळाली आहेत. प्रमाणपत्र मिळाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडेमध्ये काय काय केले आहे. या सगळ्याची माहिती अपार कार्डमध्ये असणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळा बदलली तरी हे रेकॉर्ड कायम असणार आहे. शाळेनुसार ही माहिती अपडेट केली जाणार आहे.
अपार कार्डची नोंद कशी करायची
- विद्यार्थ्यांना या कार्डच्या नोंदणीसाठी एक अर्ज देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांना बारा अंकांचे हे अपार कार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव पत्ता त्यांचा आधार कार्ड क्रमांक त्याचप्रमाणे बारा अंकी कार्ड क्रमांकाने क्यूआर कोड देखील आहे.
- हे कार्ड काढणे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही.