Apple Cider Vinegar Benefits | सफरचंदाचा व्हिनेगर आहे विविध गुणधर्मांनी समृद्ध, अशाप्रकारे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Apple Cider Vinegar Benefits आपण नेहमीच असे ऐकले आहे की, दिवसाला एक सफरचंद खा आणि डॉक्टरला तुमच्यापासून लांब ठेवा. म्हणजे सफरचंदामध्ये अनेक असे विविध गुणधर्म आहे. ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होत असतो. परंतु केवळ सफरचंदच नाही तर सफरचंदापासून बनवलेले विनेगर देखील आपल्याला खूप फायदे देतात. याच्या सेवनाने केवळ रक्ताची साखर नियंत्रणात राहत नाही, तर एलडीएल किंवा बॅड कोलेस्ट्रॉलपासून देखील आपल्याला सुटका मिळते. आज आपण या सफरचंदाच्या विनेगरपासून आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात. हे जाणून घेणार आहोत.

मधुमेहासाठी फायदेशीर | Apple Cider Vinegar Benefits

ऍपल सायडर व्हिनेगर हे रक्तातील साखळीची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्याचप्रमाणे मधुमेहापासून देखील यामुळे सुटका मिळते. तुमची शुगर जर खूप वाढली असेल, तर ऍपल सायडर व्हिनेगर पिणे हे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

ऍपल सायडर व्हिनेगर हे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी एक चांगले औषध आहे. याच्या रोजच्या सेवनाने भूक कमी होते. त्यामुळे आपण जास्त खात नाही आणि आपले पोट देखील खूप वेळ भरलेले राहते. त्यामुळे कॅलरीज देखील कमी होतात. आणि वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर होते.

उच्च रक्तदाबासाठी फायदेशीर

आजकाल खराब कॅलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढलेल्या आहेत आणि हे नियंत्रित ठेवण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले घटक हे अनेक आजारांचा धोका कमी करतात.

त्वचा निरोगी ठेवते

ऍपल सायडर व्हिनेगर हे आपल्या त्वचेची पीएच पातळी राखण्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेला खाज सुटणे, लालसरपणा किंवा त्वचेचा संसर्ग असणाऱ्या जिवाणू नष्ट करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर फायदेशीर आहे

सेवन कसे करावे ?

ऍपल सायडर व्हिनेगर वापरताना तुम्ही सुरुवातीला फक्त पाच ते दहा मिलीच्या डोसपासून सुरुवात करा. यासाठी एक ग्लास घ्या त्यात दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर टाका. त्याचे जास्त सेवन केल्याने दात आणि हिरड्यांची संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे काहीही करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.