Apple Farming | दुष्काळी भागात सफरचंदाची शेती करून शेतकऱ्याने रचला विक्रम, वर्षाला घेतोय लाखो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Apple Farming | आजकाल सफरचंदाची शेती अनेक भागांमध्ये केली जाते. परंतु काश्मीर सारख्या बर्फाळ ठिकाणी सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात सफरचंदाची शेती कोणी करू शकेल असा कधी आपण विचारही केला नसेल. परंतु हे खरे झालेले आहे. ते म्हणजे आता महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने एक एकरमध्ये सफरचंदाची शेती केली आहे. त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. आज त्याला लाखोंचे उत्पन्न देखील मिळत आहेत.

सातारा जिल्ह्यातील मान येथील टाकेवाडी या ठिकाणी राहणारे जालिंदर दडसे अनेक वर्षापासून शेती करतात. त्यांनी youtube वरून माहिती घेऊन काश्मीर, राजस्थान आणि बाहेरील देशातून म्हणजे हॉलंड आणि इटलीमधून चार जातींची सफरचंदाची (Apple Farming) रोपे मागवलेली होती. एका एकरमध्ये त्यांनी सफरचंदाच्या चार जातींच्या पाचशेहून अधिक झाडांची लागवड केली. त्यांनी लावलेल्या या झाडाला जवळपास 150 किलो इतके फळे तयार होत होती.

सुरुवातीला त्यांना या सफरचंदाच्या लागवडीमधून महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न होत होते. तर वार्षिक त्यांना सहा ते साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहेत.

सफरचंदाची (Apple Farming) ही शेती करताना त्यांनी झाडांना सेंद्रिय पद्धतीने शेणखताचा वापर केल्याचे सांगितले आहे. असे केले, तर फळाला चांगली गोडी येते. त्याचप्रमाणे वेळच्या वेळी स्प्रेची फवारणी करणे देखील गरजेचे आहे. दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची शेती केली जाते. परंतु या व्यक्तीने एका एकरमध्ये सफरचंदाची लागवड करून युवा पिढीपुढे एक वेगळ्या असे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केलेली ही शेती सध्या सोशल मीडियावर देखील चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक लोक आता महाराष्ट्रात राहून सफरचंदाची शेती करण्याचा विचार देखील करत आहे.