मोबाईलच्या दुनियेत मोबाईचा राजा म्हणून मिरवणाऱ्या Apple चा पुढचा फोन iPhone SE 4 बाजारात येण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्ट नुसार Apple च्या नव्या फोनमध्ये Apple Intelligence फिचर असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
यापूर्वी आयफोनच्या Apple iPhone 16 सिरीज साठी ग्राहकांनी अक्षरशः झुंबड लावल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र आता iPhone SE 4 ला देखील यशस्वीपणे पुढे आणू इच्छित आहे. रिपोर्टनुसार Apple चा नवा आयफोन iPhone SE 4 हा दिसायला कसा असेल? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर iPhone14 आणि iPhone 15 सारखाच हा फोन दिसेल. यात फक्त एक कॅमेरा असेल आणि हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतो ही यातली जमेची बाजू असणार आहे. जर हा फोन iPhone१५ सारखा दिसत असेल तर अनेकांना तो विकत नक्कीच घ्यावासा वाटेल.
iPhone 15 च्या बाबतीत बोलायचं झालं तर आयफोन 15 ची किंमत कमी झाली असून हा फोन केवळ 69 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येतो. मात्र iPhone 15 च्या रेग्युलर मॉडेलमध्ये एआय फीचर दिलेलं नाही. हे फीचर फक्त आयफोन 15 प्रो आणि Apple iPhone 16 या सिरीज मध्ये उपलब्ध आहे जर का Apple ची नवी सिरीज कमी किमतीत आणि AI फीचर्स उपलब्ध करून दिलेली असेल तर हमखास लोक विकत घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.