Apple भारतात वर्षाला बनवणार 5 कोटी आयफोन; मेड इन इंडियावर असेल जास्त भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या भारतामध्ये आयफोनला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच आयफोनचा भारतातील खप देखील वाढला आहे. त्यामुळेच आता अ‍ॅपल कंपनीने भारतात वर्षाला पाच कोटी आयफोन बनवण्याची तयारी दाखवली आहे. येत्या दोन ते तीन वर्षात असे करणे शक्य असल्याचा दावा ही कंपनीकडून करण्यात आला आहे. ॲपल कंपनीला वर्षाला पाच कोटी आयफोन बनवणे शक्य झाल्यास जगातील एकूण आयफोनपैकी 50% आयफोन हे मेड इन इंडिया असणार आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांमध्ये ॲपल कंपनीने भारतात 58 हजार कोटी पेक्षा जास्त किमतींचे आयफोन असेंबल केले आहेत. अशा परिस्थितीत गेल्याच महिन्यात फॉक्सकॉनने भारतात सुमारे 13 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून भारतात फॉक्सकॉन आयफोनचे उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टाटा समूह देखील भारतामध्ये आयफोन निर्मितीमध्ये मोठे योगदान देणार आहे. तमिळनाडू या ठिकाणी कारखाने सुरू करण्याची योजना टाटा कंपनीने आखली आहे. पुढील दोन वर्षात 20 असेम्बली लाईन सुरू करण्यात येतील, आणि त्याचठिकाणी पन्नास हजार कर्मचाऱ्यांना देखील नोकरी देण्यात येईल, अशी माहिती टाटा समूहाकडून देण्यात आले आहे. टाटा समूहाने आयफोनच्या निर्मितीसाठी कर्नाटकमधील विस्ट्रॉन फॅक्टरी विकत घेतली आहे.