पुसेसावळी आरोग्य केंद्र : सचेतन घोडकेचं “घोडे काही हलेना अन् रूग्णांना उपचार काही मिळेनात”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांसह तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्रातील द्वितीय वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके या अधिकार्‍यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. तरी या आरोग्य केंद्रात मनमानी कारभार सुरु असल्याने येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची हेळसाड होत आहे. येथील अधिकारी सचेतन घोडकेचं घोडे काही हलेना अन् रूग्णांना उपचार काही मिळेनात अशी अवस्था पुसेसावळी आरोग्य केंद्रात पहायला मिळते.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्य केंद्रामध्ये अत्याआवश्यक रुग्ण अॅडमिट केले जातात. परंतु सध्या कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात कमी व बाहेरच जास्त असल्याचे अनेकवेळा निर्दशनास आले असल्यामुळे रुग्णांची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित राहत असल्याचे सबंधित नातेवाईकां कडून बोलले जात आहे. तरी अनेकवेळा वैद्यकीय अधिकार्‍यांकडुन वेळकाढूपणा केल्याने यामध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुसेसावळीसह परिसरातील पंधरा ते वीस गावांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे असुन या ठिकाणी सुरु असलेल्या घोडके या अधिकार्‍यांचा मनमानी कारभारावर स्थानिक प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.

त्याच बरोबर वरिष्ठ प्रशासनाने या अधिकाऱ्यास सेवा मुक्त करून वेळेवर हजर न राहणे, रूग्णांना उचित सेवा न देणे, कायम गैरहजर राहणे याबाबत योग्य ती कारवाई करावी. तसेच स्वतःच्या केबीनमध्ये बेकायदेशीरपणे व्हिडिओ रेकॉर्डर बसवून त्याचे रेकॉर्डिंग स्वतःच्या मोबाईल मध्ये घेऊन त्याबाबतचे स्टेट्स स्वतःच्या मोबाईल ठेवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे परिसरातील उपचारासाठी येणाऱ्या महिला रूग्णांची वैयक्तिक पातळीवर असलेल्या गुपीत आजार किंवा गुप्तांगाबाबतच्या तक्रारी वैद्यकीय अधिकारी यांना बिनधास्त सांगितले. तरच त्यावर योग्य तो उपचार मिळतील, या आशेने सांगत असतात. परंतु या द्वितीय वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडकेने बेकायदेशीर बसवलेल्या या रेकॉर्डरमध्ये ते संपूर्ण रेकॉर्डिंग होत आहे. त्यामुळे महिलांना ब्लॅकमेल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या घोडके वर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील रुग्णांकडुन होत आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रामुख्याने स्त्रिया, मुलांच्या आरोग्य, बाळांतपणाचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. हे घोडके नामक अधिकाऱ्याकडून होत असल्याचे दिसून येत नाही.

पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या महिला रूग्णांना सावधानतेचा इशारा?
पुसेसावळी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्याने येथील आरोग्य केंद्रात चोवीस तास वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे. तर याची जबाबदारी पुर्णतः प्रथम वैद्यकीय अधिकारी अक्षय जरांडे यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. तर द्वितीय वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके कायमच गैरहजर असलेने तसेच बेकायदेशीर रेकॉर्डिंग करत मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याने सचेतन घोडके वर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. तर येत्या काळात होणाऱ्या होणाऱ्या परिणामांना स्वतः द्वितीय वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके आणि प्रशासन जबाबदार राहील अशी चर्चाही परीसरात सुरू आहे.

जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?
पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सचेतन घोडके याची यापुर्वीची नियुक्ती वेळेवर हजर नसणे, रूग्णांना न तपासता लांबूनच ऐकुन औषधे देणे, आलेल्या रूग्णांना भरमसाठ टेस्ट करण्यासाठी भाग पाडणे, वेळेवर हजर नसलेने आरोग्य केंद्राच्या आवारात प्रसुती होणे, विनाकारण उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रूग्णालयात रेफर करणे बेजबाबदार वागणूक पाहिली आहे. पूर्वीपासून वादग्रस्त नियुक्ती ठरलेल्या अधिकाऱ्यास सेवा मुक्त करण्याऐवजी पुन्हा पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्रात यमराज रूपी नियुक्ती केल्यामुळे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न परिसरातील रुग्णांकडुन उपस्थित केला जात आहे.