विधिमंडळात शिवसेनेच्या 2 आमदारांमध्ये तुफान राडा; अंतर्गत वाद चव्हाट्यावर??

MLAs fights
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असतानाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. एकाच पक्षांमध्ये असणाऱ्या या दोन आमदारांमध्ये वाद झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांचा वाद मिटवण्यासाठी शेवटी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र अद्याप हा वाद कशावरून झाला हे समजलेले नाही.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात व्यवस्थितरीत्या कामकाज सुरू होते. मात्र राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांच्यात धक्काबुक्की आणि वादावादी झाल्यामुळे कामकाज एक तासासाठी तहकूब केले गेले. मुख्य म्हणजे, अद्याप हा वाद कशावरून झाला हेच समोर आलेले नाही. मात्र सुरू झालेली बाचाबाची धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्यानंतर विधीमंडळाच्या लॉबीमध्ये चांगलाच राडा झाला.

यानंतर दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वाद मिळवण्यासाठी शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली. या सर्व प्रकरणावरून आता विरोधक शिंदे घाटाच्या आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. त्या दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे आमदार झालेल्या प्रकरणी सारवासारव करत आहेत. यावरूनच माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळेच शिंदे गटात काही अंतर्गत वाद सुरू आहेत का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.