“राऊत साहेबांना अटक म्हणजे शिवसेनेचा बुलंद आवाज दडपण्याचे कारस्थान” – पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Sanjay More : आमचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक आदरणीय खासदार संजय राऊत साहेबांना ईडीने केलेली अटक म्हणजे शिवसेनेचा बुलंद आवाज दडपण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे. Sanjay More

शिवसेनेची मुलुखमैदान तोफ खासदार संजय राऊत यांना काल सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली. त्याविषयी कालपासून जोरदार प्रतिक्रिया उलटत आहेत. पुणे शिवसेना शहरप्रमुख यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलतांना भाजप नेत्यांना आणि सेना बंडखोरांचा ( शिंदेसेना ) यांचा जोरदार समाचार घेतला. Sanjay More

मोरेंना शिंदे घटाकडून कुठली ऑफर आलीय आहे का ? असे विचारले आता ते म्हणाले की “मी हाडाचा शिवसैनिक आहे. माझ्यावरचे संस्कार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळकडूचे संस्कार आहेत.त्यामुळे या बंडखोरांची मला फोन करण्याची हिंमत नाही आणि ते तसे कधीच करू शकणार नाहीत.कारण त्यांना माझा हिसका चांगलाच माहित आहे. Sanjay More

दरम्यान,संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी सुनावणी चालू आहे. पण जनमानसात राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विषयी लोकांच्या मनात प्रचंड आपुलकीची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. Sanjay More

हे पण वाचा :

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!

पेन्शनधारकांसाठी EPFO ​​ने सुरू केली नवी सुविधा !!!

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!

ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???

Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा