पुणे | अर्थनियोजन हे एक प्रकारचे कौशल्य आहे आणि ते शाळेच्या माध्यमातून शिकविले जात नसल्याच माजी, सैन्य अधिकारी प्रिंस पॉल यांचं म्हणन आहे, ते पत्रकार परिषदेत या संस्थेची भूमिका मांडत होते.
ते म्हणाले, आर्थिक नियोजनाचे धड़े हे शाळेकडुन अपेक्षित असूनही ते शिकवत नाहीत, व ते शिकवण्यास ते असमर्थ असल्याचा आरोप ही त्यांनी या वेळी केला, मुलांना शाळा बाह्य आर्थिक व्यवहार प्रत्यक्षपणे कौशल्य विकसित करण्यासाठी निमका ही संस्था कार्यरत आहे असे म्हणाले, निमका संस्थेचा उद्देश किशोरवयीन मूला मुलींची आर्थिक समज वाढावी, मुले मनी स्मार्ट व्हावित, जगाच्या आर्थिक स्पर्धेत बरोबरिला जाण्यास प्रत्यक्ष सहभाग़ासाठी प्रवृत्त करणे. या प्रशिक्षण योजनेचा कालावधी दोन महिन्यांच्या असून आठवड्याचे दोन दिवस याचा लाभ घेता येणार आहे, व यासाठी शुल्क रु.६००० प्रति व्यक्ति असेल.