काही मिनिटांतच ही मुलगी कधी होते घुबड तर कधी सिंह..! पाहून व्हाल चकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळतात. त्या अनेक व्हिडिओतून आपल्याला पहायला मिटता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीच्या कलात्मकतेचाही असाच एक सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडीओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. यात ती कधी घुबड तर कधी सिहाचे रूप परिधान करते. तीने हालचाल केल्यास ती इतर प्राण्यांप्रमाणे वाटते.

महिंद्रा अॅड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, ती मुलगी उभी असलेल्या स्टेजची रचना जंगल थीमवर करण्यात आली आहे आणि एक एक करून ही मुलगी विविध प्राणी आणि पक्ष्यांचे रूप धारण करताना दिसते. सुरुवातीला ती एखाद्या पक्ष्यासारखी होते. त्यानंतर ती हळूहळू अनेक प्राण्यांचे रूप दाखवते.

विशेष म्हणजे अनेक प्राण्यांचे चित्र या मुलीने आपल्या शरीरावर रेखाटली आहेत. ती जशी आपले आग हलवते. तशी प्राणी व पक्षी आपोआप तयार होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये घुबडापासून सिंहापर्यंत ही मुलगी एकाच वेळी किती रूप बदलते हे आपण पाहू शकतो. महिंद्रा यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “Fantastic #Friday in the Forest. Wait for the last one…” विशेष म्हणजे त्याचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे.