अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची तुरुंगातून सुटका होणार; उच्च न्यायालयाचा आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawali) याची आता तुरुंगातून कायमची सुटका होणार आहे. कारण, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतीपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातच उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी ही जेल प्रशासनाला देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला अरुण गवळी नागपूर कारागृहात शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. परंतु आता त्याची या शिक्षेतून सुटका होणार आहे.

गेल्या 2006 साली अरुण गवळी याने शिक्षेतून सूट मागितली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अरुण गवळीच्या सुटकेच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. या याचिकेवर आज पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर न्यायालयाने दिले. हे निर्देश दिले असताना देखील न्यायालयाने जल प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

त्यामुळे आता जेल प्रशासन अरुण गवळीच्या सुटकेबाबत नेमका काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरात कुख्यात गुंडा म्हणून अरूण गवळीचे नाव चर्चेत राहिली आहे. याच अरुण गवळीने कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केली होती. या सत्यप्रकरणी अरुण गवळी याला 2012 साला जन्मठेपेचे शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता याच अरुण गवळीची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

न्यायालयाने हा निर्णय कसा घेतला?

2006 सालच्या शासन निर्णयानुसार, एखाद्या कैद्याने कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केली असेल तर त्या कैद्याला पुढील शिक्षेत सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, 65 वयोवर्षे ओलांडलेल्या शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या कैद्यांना देखील शिक्षेतून सूट देण्याची तरतूद शासन निर्णयात आहे. यामध्ये, अरुण गवळी हा 2007 पासून म्हणजे सोळा वर्षे तुरुंगात आहे. तसेच, त्याचे वय देखील 69 वर्ष आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार अरुण गवळीची सुटका होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.