Arvind Kejriwal : 2 दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

Arvind Kejriwal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी मोठी घोषणा केली आहे. २ दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारा आहे असं केजरीवाल यांनी म्हंटल आहे. मनीष सिसोदिया हे सुद्धा मुख्यमंत्री होणार नाहीत, तर नवा कोणता तरी चेहरा दिल्लीचा मुख्यमंत्री होईल, याबाबतचा निर्णय विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. केजरीवाल यांच्या या निर्णयाने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

…. तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही- Arvind Kejriwal

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘मी आजपासून दोन दिवसांनी राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत, गेल्या 10 वर्षांत त्यांनी अटी लादण्यात कोणतीही कसर सोडली नाही. केंद्र सरकारने कायदा करून माझे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला, तो काळ सुद्धा आम्ही अनुभवला आहे. मात्र जनतेच्या आशीर्वादाने भाजपच्या सर्व कारस्थानांना तोंड देण्याची ताकद आमच्यातआहे. आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, थांबणार नाही आणि विकले सुद्धा जाणार नाही असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपला इशारा दिला.

मला न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे. आता जनतेच्या न्यायालयात जाऊन मी न्याय मागणार आहे. जनता सुद्धा नक्कीच मला न्याय देईल. दिल्ली विधानसभा निवडणुका फेब्रुवारीत होणार आहेत, मात्र लवकरात लवकर निवडणूक व्हाव्यात अशी आमची मागणी असल्याचे केजरीवाल यांनी म्हंटल. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राबरोबरच दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका व्हाव्यात असं केजरीवाल म्हणाले. जर तुम्हाला केजरीवाल प्रामाणिक वाटत असतील तर त्यांच्या बाजूने मतदान करा असं केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.