मोठी बातमी!! अरविंद केजरीवालांच्या कोठडीतील मुक्कामात 15 एप्रिलपर्यंत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी आज आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने (ED) 21 मार्चला अटक केली होती. आज ईडीतील काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने केजरीवाल यांना येत्या 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी केजरीवाल यांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती.

आज ईडी काेठडीतील अरविंद केजरीवाल यांची मुदत संपल्यानंतर त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्‍या पत्‍नी सुनीता केजरीवाल, आपचे नेते सौरभ भारद्वाज, आतिशी, गोपाल राय असे नेते मंडळी उपस्थित होते. या सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, दरम्यान, मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील ताब्यात घेतले आहे. तसेच, याच प्रकरणामुळे आपच्या काही नेत्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

दिल्लीमधील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी 9 वेळा समन्स बजावले होते. त्यामुळे या विरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने त्यांचीही याचिका फेटाळून लावले. त्यामुळे 21 मार्च रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला. तसेच, केजरीवाल यांना चौकशी दरम्यान अटक करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्यांना येत्या 15 एप्रिल रोजीपर्यंत कोठडीतच राहावे लागणार आहे.