बायडेन यांनी इस्रायल सोडताच हिजबुल्लाहचा अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. मात्र इस्रायलहून परताच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बायडेन अमेरिकेत परतल्यानंतर लगेच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहयोगी सैन्याचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, लष्करी तळ देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.

मुख्य म्हणजे, इराकमधील लष्करी तळांवर 24 तासांत दोन  ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. पश्चिम आणि उत्तर इराक मधील लष्करी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यात सहयोगी लष्कराचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मात्र अद्याप, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांकडून हिजबुल्लाहने तीन ड्रोन हल्ले केल्याची माहिती देण्यात आली आहे. हा हल्ला इराक आणि कुर्दिस्तान प्रदेशाच्या पश्चिमेकडील अल-हरीर एअर तळावर करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी इराण समर्थित गटांनी अमेरिकन सुविधांवर हल्ला करण्याची थेट धमकी इस्त्रायलला दिली होती. त्यानंतर इस्लामिक रेझिस्टन्सने दोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत म्हटले की, हा हल्ला इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम आहे.  अमेरिका इस्रायला शस्त्रे आणि सर्व प्रकारे मदत करत आहे. मात्र, इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.  मुख्य म्हणजे, या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्करी तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या हल्ल्यानंतर अमेरिका काय पाऊल उचलले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.