औरंगाबाद | पत्नी माहेर गेल्याच्या रागाने जावयाने सासर गाठून सासूच्या डोक्यात दुचाकीच्या रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 14 जुलै रोजी सकाळी सातारा गावात उघडकीस आली. पद्या मत्सुद असे जखमी महिलेचे नाव आहे. यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ज्ञानेश्वर चंद्रभान आहेर वय 35, (रा. येरंड, ता. येवला) प्रज्ञा यांची मुलगी पूजा हिचा ज्ञानेश्वर सोबत विवाह झाला आहे. त्यांना दहा वर्षाचा एक मुलगा आहे मागील काही दिवसापासून ज्ञानेश्वर दारूच्या आहारी गेला आहे. त्याच्या या दारूच्या व्यसनाला कंटाळून पूजा आपल्या आईकडे साताऱ्यात राहण्यासाठी गेली.
बुधवारी पद्या हिचे भाऊ कामावर गेले असताना ज्ञानेश्वर दुचाकीवरून घरी आला. त्याच्या दहा वर्षाच्या मुलाला मारहाण करत सासूला माझ्या पत्नीला येथे का आणून ठेवले. तुला संपूनच टाकतो असे म्हणत दुचाकीच्या शोकप रोडणे डोक्यावर वार केला. यात पद्या या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर पळून जाताना ज्ञानेश्वर देखील दुचाकीवरून पडून गंभीर झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात पद्या यांचा मुलगा संदीपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




