अद्भुत! तब्बल 15 हजार पणत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची प्रतीमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाच्या दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. पैठण येथील आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेने दिवाळी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची 15 हजार पणत्या प्रज्वलित करून प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेला दोन एकर क्षेत्रात साकारण्यात आले आहे. त्यामुळे डोळे दिपवून टाकणारे हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक शाळेच्या मैदानात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर देखील या प्रतिमेचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच, आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेचे विशेष कौतुक केले जात आहे.

मंगळवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेने 15 हजार दिव्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली. तसेच, 54 किलो फुले, 45 किलो रांगोळी वापरून “दिव्य शिवोत्सव व राजमुद्रा” ही साकारली. पुढे, महाराजांची प्रतिमा पूर्ण झाल्यानंतर 350 रंगीबेरंगी फटाके वाजवून तयार केलेल्या प्रतिमेस सलामी देण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी पैठणमधील मोठ्या संख्येने नागरिक शाळेच्या आवारात आले होते.

मुख्य म्हणजे, शिवाजी महाराजांची ही प्रतिमा साकारण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी 15 हजार पणत्या जमवल्या होत्या. यानंतर त्यांनी, अवघ्या 22 मिनटात 15 हजार पणत्या प्रज्वलित करून महाराजांची प्रतिमा साकारली. यावेळी, 54 किलो फुले, 45 किलो रांगोळीच्या सहायाने “दिव्य शिवोत्सव व राजमुद्राही” साकारली. खास म्हणजे, महाराजांचे प्रतिमा साकारण्यासाठी, 15 हजार पणत्या, 105 लिटर तेल, 30 हजार वाती, 54 किलो फुले, 45 किलो रांगोळी व ८×१६ चा भगवा ध्वज एवढे साहित्य वापरण्यात आले. ज्यावेळी ही प्रतिमा तयार झाली होती, तेव्हाचे दृश्य डोळे भरून पाहावे एवढे सुंदर होते.