राज्यातील तब्बल 45 साखर कारखाने होणार बंद; हे आहे मोठं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. परंतु त्यापूर्वीच साखर कारखान्यांना अडचणीत आणणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे प्रदूषण मंडळाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याकारवाईमुळे साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक कारखाने असे आहेत जे प्रदूषणाचे नियम पाळत नाहीत. यामुळे हवा प्रदूषण आणि पाणी प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच केंद्रीय प्रदूषण मंडळाने राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कमलेश सिंग यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवले आहे.

संबंधित पत्रात प्रदूषण मंडळाने म्हटले आहे की, “राज्यातील 45 साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर या कायद्याच्या कलम 5 नुसार कोणताही कारखाना बंद करण्याचा आणि कारखान्याच्या सर्व सुविधा बंद करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे येत्या, 10 नोव्हेंबरपर्यंत 45 कारखान्यांची भेट घेऊन सद्यस्थिती तपासून मंडळाकडे अहवाल सादर करावा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश रद्द झाल्याशिवाय कोणत्याही कारखान्याचा हंगाम चालू होणार नाही”

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 210 सहकारी साखर कारखाने आहेत. यातील 105 कारखाने गळीत हंगाम घेतात. यातील 45 साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या सर्व कारखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रदूषण मंडळाकडून घेण्यात आला आहे. ज्यामुळे साखर कारखाने मोठ्या अडचणी सापडले आहेत.