Saturday, March 25, 2023

कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी तांबवेकर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी नितीन तांबवेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला धनाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली. या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी कमलेश पाचुपते यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा सरिता महिला बझार येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी तांबवेकर यांची; तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला चव्हाण यांची निवड करण्यात आली.

- Advertisement -

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. स्मिता दुर्गेश चव्हाण, सौ. अपर्णा युवराज शिंदे, सौ. रंजना निवास घोरपडे, सौ. भारती मोहनराव जाधव, सौ. धनश्री धनंजय राजहंस, सौ. दिपाली संजय पिसाळ, सौ. सविता जगन्नाथ फसाले, सौ. रजनी अशोक गुरव, सौ. आशा रमेश माने यांच्यासह व्यवस्थापक आनंदराव पाटील उपस्थित होते.