हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंगाचा वापर आपण चविष्ट भाजी बनवण्यासाठी नेहमी करत असतो. मसाल्यांमध्ये ही हिंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. हेच हिंग (Asafoetida) आरोग्यासाठी ही तितकेच फायदेशीर ठरते. हिंगामुळे जड पदार्थ पचनास सोपे जातात. गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. यात तुम्ही जर हिंगाचे पाणी दररोज पिले तर इतरही अनेक फायदे शरीराला होतील. आज आम्ही तुम्हाला हेच फायदे सांगणार आहोत.
पचनक्रिया व्यवस्थित होते – पचनशक्ती तीव्र करण्यासाठी हिंगाचे पाणी प्यावे. हिंगाचे पाणी पिल्यामुळे पचन क्रियेला गती मिळते आणि अन्न पचण्यास मदत होते. यासह बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी, अपचन यांच्यासारख्या सर्व समस्या दूर होतात आणि पोट निरोगी राहते.
वजन कमी होते – दररोज रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिला तर तुमचे वजन कमी होईल. तसेच पोटाची चरबी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी पाणी पिऊ शकता. हिंगामुळे वजन नियंत्रणात राहते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते – मधुमेहाच्या रुग्णासाठी हिंगाचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. रक्तातील साखर कमी करायची असेल तर दररोज हिंगाचे पाणी प्यावे. असे केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर – हिंगाचे पाणी पिणे शरीरासाठी चांगले असतेच परंतु हिंगाची पेस्ट चेहऱ्याला लावणे ही फायदेशीर ठरते. असे केल्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या पिंपल्ससारख्या समस्या दूर होतात. हिंगाचे पाणी दररोज पिल्यामुळे ही चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही.
सर्दी खोकला बरा होतो – सर्दी खोकला बरा करण्यासाठी हिंग अत्यंत फायदेशीर ठरते. हिंगाचे पाणी पिल्यामुळे श्वसनाचा त्रास दूर होतो. तसेच, यामुळे रक्तवाहिन्यांमधील सूज कमी होते. अशा अनेक समस्यांवर ही हिंगाचे पाणी पिणे रामबाण उपाय ठरते.
लक्षात ठेवा की, इतर आजार असलेल्या लोकांनी किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांनी हिंगाचे सेवन करू नये. मात्र याव्यतिरिक्त लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्यावे. त्यात हिंग मिसळावी. यानंतर पाण्यात हिंग चांगली विरघळू द्या. मग या पाण्याचे सेवन करा.