आमदार शिवेंद्रराजेंच्या गटाकडून खासदार उदयनराजेंच्या गटाचा धुव्वा; सरपंचपदासह 6 जागा काबीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाकडून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंच्या गटातील सरपंच पदासह 6 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर उदयनराजे भोसले गटाचे 2 सदस्य उमेदवार निवडून आले.

आसनगाव हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे होमग्राऊण्ड आहे. या ठिकाणी त्यांचे बंधू आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत गटातून आपले उमेदवार उतरवले होते. अत्यंत अटीतटीच्या पार पडलेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंच्या गटाने खा. उदयनराजेंच्या गटाचा पराभव केला.

सातारा तालुक्यातील अत्यंत महत्वाची ग्रामपंचायत म्हणून दोन्ही गटाकडून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. तसेच होमग्राउंडची ग्रामपांचायत निवडणूक असल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी देखील लक्ष दिले होते. मात्र, अखेर या ठिकाणी आम. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी याठिकाणी आपल्या गटाच्या माध्यमातून करिष्मा दाखविला आहे.