Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या ; ‘या’ स्थानकांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ashadhi Ekadashi 2024 : येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात आषाढी साजरी केली जाते. या निमित्ताने पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटी आणि रेल्वे कडून देखील प्रवाशांचे मोठी सोय करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या (Ashadhi Ekadashi 2024) पुणे ते मिरज दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे या मध्यंतरीच्या असलेल्या प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.

अनारक्षित डेमो आषाढी (Ashadhi Ekadashi 2024)

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त रेल्वे विभागाकडून अनारक्षित डेमो आषाढी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या 12 गाड्या 15 ते 20 जुलै या कालावधीमध्ये धावतील. या गाड्या पुणे- मिरज- पुणे अशा धावतील. ही गाडी पुण्याहून दररोज सकाळी साडेआठ वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी मिरजला पोहोचेल. विशेष गाडी 15 ते 20 जुलै या कालावधीत मिरजहून दररोज दुपारी चार वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि हीच गाडी त्याच दिवशी रात्री अकरा वाजून 55 वाजता पुण्यात पोहोचेल.

स्थानकांचा समावेश (Ashadhi Ekadashi 2024)

या विशेष गाडीला हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब ,पंढरपूर, सांगोला ,डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमंकाळ, सालगरे आणि आरग हे थांबे असणार आहेत. ही गाडी 10 डब्यांची असेल प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे कडून करण्यात आला आहे.