Ashadhi Ekadashi : संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपुरामध्ये दरवर्षी लाखो भाविक उपस्थित होत असतात. यावेळी भाविकांच्यासाठी पंढरपूरला येण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी बसेस ची सोय केलेली असते. मात्र तरी देखील ही सोय अपुरी पडते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाकडून पंढरपुरात बस स्थानक कम यात्री निवास बांधण्यात आलं असून याचे लोकार्पण उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या बस स्थानक कम यात्री निवासाचं नाव हे ‘चंद्रभागा नगर पंढरपूर बस स्थानक’ असं ठेवण्यात आले आहे. उद्या दिनांक 17 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. शिवाय यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर हे राज्यातलं पहिलं भव्य असं 34 फलाटांच स्थानक आणि त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू (Ashadhi Ekadashi) एकाच वेळी राहतील असं यात्री निवासाचा लोकार्पण उद्या केलं जाणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्य ? (Ashadhi Ekadashi)
- एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटांचं अतिभव्य बस स्थानक निर्माण करण्यात आलं आहे.
- या बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आलं असून या निवासामध्ये एकावेळी एक हजार यात्रेकरू राहू शकतील अशी सोय करण्यात आली आहे.
- याशिवाय एसटी कर्मचारी आणि यात्रेकरूंसाठी दोन सुसज्य अशी उपहारगृह देखील (Ashadhi Ekadashi) इथे बांधण्यात आले आहेत.
- एसटी महामंडळाचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
दुसरी एक विशेष बाब म्हणजे आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. इथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांचे राहण्याची सोय करण्यात आली असून याबरोबर 1000 यात्रेकरू देखील (Ashadhi Ekadashi) राहतील असं भव्य यात्री निवास येथे बांधण्यात आले आहे. ज्याचे ल्पकारपण उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पंढरपूर ला 5000 विशेष बस
एसटी महामंडळाकडून पंढरपूर ला 5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ( Ashadhi Ekadashi 2024) एसटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन देखील एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.