Ashadhi Wari 2025 : वारकरी हा शब्द कसा तयार झाला? पंढरीच्या वारीचा इतिहास पहाच

Ashadhi Wari 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ashadhi Wari 2025 । विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला!, विठ्ठल, विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग म्हणत म्हणत आज समस्त वारकरी परिवार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला आहे. गळ्यात माळ, कपाळी टिळा आणि हातात टाळ, मृदूंग घेत, विठूनामाचा जप करत आषाढी एकादशी निमित्त हा वारकरी विठुरायाच्या दर्शनाला चाललाय. महाराष्ट्रातील एकूण वातावरण हे भक्तिमय झालं आहे. पंढरीची ही वारी साधारण २५० किमीची असते. या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरु झाली,.. वारीत चालणार म्हणजे वारकरी असं आपण म्हणतो… परंतु वारकरी हा शब्द कसा तयार झाला हे तुम्हाला माहितेय का? चला तर आज आपण याबाबत जाणून घेऊयात.

‘वारी’ म्हणजे (Ashadhi Wari 2025) विशिष्ट दिवशी विशिष्ट स्थळी जाण्याची परंपरा. ‘वारकरी’ म्हणजे ही वारी करणारे. संत तुकाराम महाराजांच्या “सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार” या अभंगातून वार आणि वारी यांचा संबंध दिसतो वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. या संप्रदायचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणे. बाप रखुमादेवी विठ्ठलाचा वारेकरु ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे. ती शब्दार्थाच्या पलिकडे जाणारी आहे. इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडला आहे.

वारी कधी सुरु झाली? Ashadhi Wari 2025

महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा म्हणजेच वारी… (Ashadhi Wari 2025) महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी.. अशी ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. वारीची नेमकी सुरुवात कधी झाला हे निश्चित सांगता येत नसले तरी, १३व्या शतकात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत गोरोबा काका यांच्या साहित्यात विठ्ठल, पंढरपूर आणि वारीचा उल्लेख आढळतो. या काळात वारी प्रस्थापित संप्रदाय म्हणून मानली जात होती. इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मते, वारी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या अगोदरही अस्तित्वात होती. सध्या महाराष्ट्रात २०० ते २५० पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत. पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.