हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानिमित्ताने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिले आहेत. त्यासंबधीचा जीआर देखील काढण्यात आला आहे. याचवेळी पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ (Ashadhi Wari Toll Free) करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ज्यादा बसेस सुद्धा सोडणार- Ashadhi Wari Toll Free
दरम्यान, हिंदू समाजात आषाढ महिन्यातील एकादशीला अन्यनसाधारण महत्त्व आहे. आषाढ एकादशी म्हंटल कि, महाराष्ट्रातील भक्तांना खास करुन वारकऱ्यांना आषाढी वारीचे आणि आषाढी एकादशीचं वेध लागत. भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजता सुरु होणार असून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी करण्यात येणार आहे.