Ashadi Ekadashi: यंदाच्या वर्षी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने प्रशासन चांगलंच सज्ज झालं आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून सुद्धा विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना पांडुरंगाचे दर्शन घेता यावं यासाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं असून यावर्षी आषाढीसाठी (Ashadi Ekadashi) तब्बल पाच हजार गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. शनिवारपासून या बसेसच्या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
महामंडळाची भारी स्कीम (Ashadi Ekadashi)
एसटी महामंडळांना नियोजित केलेल्या 5000 गाड्यांपैकी 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून गाडी देण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. म्हणजे पंढरपूरला तुमच्या गावांमधून जर 40 जणांचा ग्रुप एकाचवेळी जाणार असेल तर एसटीने त्यांच्यासाठी खास सोय केली आहे. त्यांच्यासाठी एसटी दिली जाणार आहे. आतापर्यंत एक हजार तीस गाड्यांचे बुकिंग झालं असून त्या बस आता वारकऱ्यांच्या गावातून थेट पंढरपुरात येणार आहेत.
दरम्यान एसटीच्या प्रवासात 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठांना मोफत प्रवास मिळणार आहे तर महिलांसाठी (Ashadi Ekadashi) 50 टक्के तिकीट दरात सूट दिली जाणार आहे. शासनाकडून या सवलती एसटीने प्रवास करणारा प्रवाशांसाठी लागू असणार आहेत.
प्रवाशांकरिता सवलती (Ashadi Ekadashi)
13 जुलैपासून एसटी गाड्या ह्या पंढरपूरसाठी निघणार आहेत. 3970 आगारातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत 1हजार 30 गावांमधून एसटी बुक झालेले आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा 12 ते 15 लाख भाविक (Ashadi Ekadashi) येतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर 12000 पोलिसांचा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. मागील वर्षी एसटीने 4245 विशेष बस सोडल्या होत्या यांना मात्र ही संख्या वाढवून 5000 गाड्या सोडण्यात येणार आहेत.