शेलारांसह जयंत पाटलांनी ‘या’ प्रश्नावरून शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं; उत्तर देताना शंभूराजेंची झाली दमछाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस तसेच किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यास समाधानकारक उत्तर न दिल्याने शेलार आणि पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना खिंडीत गाठले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत शेलार आणि जयंत पाटलांनी मंत्री देसाई यांना अडचणीत आणले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस पार पडत असून अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजत आहेत. दरम्यान, दुसर्या दिवशी दुपारी पार पडलेल्या प्रश्नोत्तराच्या तासाला ‘बार्टी’च्या प्रश्नावरुन भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची चांगलीच शाळा घेतली. मंत्री देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत असमाधानकारक उत्तरे दिल्याने जयंत पाटील व आशिष शेलार देसाई यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी दोघांनीही देसाईंच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

यावेळी सभागृहात उभे राहत भाजपचे शेलार म्हणाले की, बार्टीच्या माध्यमातून मागासवर्गीय तरुणांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे, ज्यातून पोलीस भरती असेल किंवा बँक भरती असेल अशा परीक्षांची तयारी मुलांना करता येते. या विद्यार्थ्यांना खासगी दर परवडत नाही म्हणून ती सोय सरकारने करुन द्यावी आणि त्यासंदर्भातला निधीही सरकारने उपलब्ध करुन द्यावा, अशी सरकारची योजना आहे. ती अतिशय चांगली योजना आहे. पण आम्ही यासंदर्भातला प्रश्न विचारल्यानंतर सरकार आम्हाला सांगतंय की, आम्ही आणि कोर्ट बघून घेऊ, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण?

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1198760400798635

शेलार यांच्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, न्यायालयात आम्ही उत्तर देऊ, हे उत्तरच आम्हाला मान्य नाही. शेवटी हा प्रश्न मागासवर्गीयांचा आहे. बजेट या सभागृहाने मंजूर केलंय ना. शेवटी 20 हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. मंत्रीमहोदय हे उत्तर सुधारणार का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यावर या प्रश्नाची सविस्तर माहिती मी घेतलेली आहे. जे जे उपप्रश्न विचारले आहे, त्यांची समाधान कारक उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन.

दरम्यान, देसाई यांच्या प्रश्नावर जयंत पाटील हरकत घेत म्हणाले की, “बार्टीच्या प्रश्नावर कोणतंही उत्तर न देता न्यायालयात याचिका आहे, त्यावर सुनावणी सुरु आहे, असे उत्तर आपण दिली. पण ५ वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिला, हे खरंय का? या प्रश्नावर सरकार उत्तर देत नाही. ४ मे रोजी २० हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तर नाही. दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई केली? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तरं नाही. आमच्या प्रश्नांना मंत्रीमहोदयांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणून हा प्रश्न राखून ठेवावा असे म्हणत जयंत पाटील यांनी मागणी केली.