मोठी बातमी! आजच अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण हे अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबाराच्या वाजता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांच्या उपस्थितीत चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे आज भाजप कार्यालयात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

आज होणार पक्षप्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चेने जोर धरला होता. या चर्चांवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. तसेच त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर नेते आणि माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. यामुळेच सर्वांचे डोळे या पक्ष प्रवेशाकडे लागले आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण येत्या 15 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील असे म्हटले जात होते. 15 तारखेला अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी बातमी समोर आली होती. परंतु राजीनामाच्या दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे याचा मोठा धक्का आता काँग्रेसला बसला आहे. आज अशोक चव्हान यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याचा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होईल, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.