काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : अशोक गेहलोत यांची माघार; सोनिया गांधीची माफी मागितली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी नंतर गहलोत यांच्या उमेदवारांनी वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत, अखेर आज त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे.

सोनिया गांधी यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर अशोक गहलोत यांनी याबाबत माहिती दिली. आपण काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री पदी ते राहतील की नाही हे मला माहीत नाही, तो निर्णय सोनिया गांधीच घेतील असं गहलोत यांनी म्हंटल. राजस्थानमध्ये जे काही घडले त्याबद्दल मी सोनियाजींची माफी मागितली आहे असेही त्यांनी सांगितलं.

गेल्या 50 वर्षांत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यानंतर मी सोनियाजींच्या काळापासून एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले. मला नेहमीच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, मग ती प्रदेशाध्यक्ष असो किंवा केंद्रीय मंत्री असो किंवा सोनियाजींच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे. असे असतानाही दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. मी सोनियाजींनाही सॉरी म्हटले आहे असं गहलोत म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. अशोक गहलोत यांनी माघार घेतल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर, मुकुल वासनिक, दिग्विजयसिंह यांची नावे चर्चेत आहेत.