व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपद निवडणुक लढवणार; सोनिया गांधींच्या भेटीनंतर निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता पुन्हा एकदा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. गहलोत यांनीही याबाबत स्पष्ट संकेत देत पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडण्यास तयार आहोत.

अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याचे मानले जात आहे. सोनिया गांधी यांच्यासमवतेच्या भेटीनंतर गहलोत यांनी निवडणूक लढवण्याची संकेत दिले. पार्टी जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन असं त्यांनी सांगितलं. मात्र त्यापूर्वी मी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना मनवण्याचा प्रयत्न करणार आहे असेही सांगायला ते विसरले नाहीत . जर राहुल गांधी तयार झालेच नाहीत तर मला अर्ज भरावा लागेल असं त्यांनी म्हंटल.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार २२ सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार असून, २४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.