जकार्ता | १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्यपदक मिळवत भारताने आशियाई स्पर्धेत आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यातील सर्वात जास्त पदके ही अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारात मिळाली आहेत. यातील अनेक क्रीडाप्रकारांत भारताला पहिल्यांदाच पदक मिळाली आहेत. २०१० सालच्या भारतीय चमूने एकूण ६५ पदकांची कमाई केली होती. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.