मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती असलेली भारतीय धावपटू एम.आर.पूवम्मा हि गेल्यावर्षी डोपिंग (Doping test) प्रकरणात दोषी आढळली होती. त्यानंतर आता तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शिस्तपालन समितीनं तिच्यावर घातलेली 3 महिन्यांची बंदी रद्द करून ‘नाडा’च्या डोपिंगविरोधी (Doping test) अपील पॅनलने तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी पतियाळात इंडियन ग्रँड प्रीक्स -1 स्पर्धेदरम्यान पूवाम्माची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जागतिक डोपिंग विरोधी संस्थेनं बंदी घातलेला मिथाइल हेक्सेन अमाइन हा पदार्थ पूवम्माच्या शरीरात आढळून आला होता. यानंतर डोपिंगविरोधी (Doping test) शिस्तपालन पॅनेलने जून महिन्यात पूवम्मावर कारवाई करून तिला तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. यानंतर शिस्तपालन समितीनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात अपील करण्यात आल्यानंतर ‘एडीएपी’ने पूवम्माच्या खेळण्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
पूवम्माची आतापर्यंतची कामगिरी
2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4×400 मीटर महिला आणि मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाची पूवम्मा ही एक सदस्य होती. 2014 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4×400 मीटर रिले संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्या टीममध्येही पूवम्माचा सहभाग होता. 2012 मध्ये आशियाई खेळांमध्ये पूवम्माने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक कांस्यपदक जिंकले होते. तिच्या या कामगिरीमुळे तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आता जाणून घेऊया डोपिंग म्हणजे नेमकं काय?
मैदानावरची आपली कामगिरी प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस व्हावी, यासाठी खेळाडूंकडून काही औषधं/ड्रग्ज घेतली जातात. कोणती औषधं किंवा कोणते घटक पदार्थ असलेली औषधं किंवा द्रव्य घेतली जाऊ नयेत, याचे काही नियम ठरलेले असतात. हे प्रतिबंधित घटक खेळाडूच्या शरीरात आढळल्यास त्याला डोपिंग (Doping test) असे म्हंटले जाते. प्रत्येक स्पर्धेआधी हि डोपिंग टेस्ट केली जाते. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था व जागतिक डोपिंग विरोधी संस्थेकडून हि डोपिंग टेस्ट केली जाते.
हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर