नौकानयनात भारताचा धमाका, महिला कबड्डीत आज सुवर्णपदकाची आशा

0
52
naukanayan
naukanayan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांघिक सुवर्णपदक तर वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई

जकार्ता | येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नौकानयन संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश, सुखमीत सिंग यांच्या संघाने ६ तास १७ मिनिटे १३ सेकंद अशी आश्वासक वेळ नोंदवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. दुष्यंत सिंग चौधरी याने लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तर रोहित कुमार व भगवान सिंह यांनीही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

याव्यतिरिक्त महिला कबड्डी संघ आज अंतिम सामन्यात इराणशी भिडेल. दीपा कर्माकरही अॅथलेटिक्सच्या अंतिम फेरीत आज आपलं आव्हान सादर करेल. टेनिस दुहेरीत रोहन बोपन्ना व दिविज शरण ही जोडी सुवर्णपदकासाठी खेळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here