हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासदाराला पाडायची हिम्मत दाखवणारा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य… पाच मतदारसंघातून मायनसमध्ये जाऊनही एकट्या मालेगाव मध्यने काँग्रेसच्या उमेदवाराला 1 लाख 21 हजाराचं लीड दिलं… आणि भाजपचा कणका पाडत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला… मालेगाव मध्य मध्ये ही ताकद येते ती इथल्या बहुसंख्यांक मुस्लिम समाजामुळे… तब्बल 80 टक्के मुस्लिम समाज असणाऱ्या या मतदारसंघात एक वेळ पक्ष बदलेल पण आमदार हा समाजातच राहतो, अशी इथली परंपरा… पण लोकसभेच्या निकालानंतर मालेगाव मध्यमध्ये अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत.. त्यातही विद्यमान आमदार एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि असिफ शेख यांच्यात 2019 प्रमाणेच काट्यावरची लढत पाहायला मिळेल… त्यामुळे खासदारा तर ठरला.. पण मालेगाव मध्यचा आमदार कोण? याच प्रश्नाचं जमिनीवरचं विश्लेषण पाहुयात आजच्या व्हिडिओमध्ये…
मालेगाव मध्य हा राज्यातील सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. .. कारण मतदारसंघात तब्बल 80 टक्के मुस्लिम समाज राहतो…मालेगाव मध्य या मतदार संघावर सलग पंचवीस वर्ष जनता दलाचे निहाल अहमद यांची पकड होती.. पुढे रशीद शेख यांनी काँग्रेसच्या पंजाला या मुस्लिम बहुल मतदारसंघात बेस मिळवून दिला… पण 2009 साली मुस्लीम धर्मगुरु मौलाना मुफ्ती ईस्माइल यांनी धार्मिक कट्टरतावादाला प्राधान्य देत… रशीद शेख यांच्या विकासाच्या राजकारणाला साईडलाईन करत धर्म मोठा केला… पण 2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. उच्च शिक्षित असलेला आसिफनं मुस्लिम आरक्षण, यंत्रमाग उद्योगाला सवलती मिळवून देण्याचा शब्द देऊन प्रचार केला…निवडणूक लढली… आणि जिंकली देखील… पुढील पाच वर्षांत आसिफ शेख यांनी मतदार संघातला आपला कनेक्ट अजिबात कमी होऊ दिला नव्हता…
हेच असिफ शेख 2019 ला काँग्रेसकडून एमआयएमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्याविरोधात रिंगणात होते… तर भाजपकडून दिपाली वारुळे निवडणुकीच्या रिंगणात होत्या… हे अत्यंत अटीतटीची आणि घासून झालेल्या लढतीत जनतेनं एमआयएमच्या म्हणजेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या बाजूने आमदारकीचा कौल दिला… इथल्या मुस्लिम समाजाच्या ताकतीचा अंदाज लावायचा असेल तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्छाव या पाचही विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या… थोडक्यात त्यांचा पराभव फिक्स होता… पण एकट्या मालेगाव मध्यने वारं फिरवलं… आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विक्रमी लीड दिलं… अर्थात या मतदारसंघावर महायुतीला पकड मिळवणं अवघड असलं तरी इथली मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध एमआयएमआयएम अशी होईल असा एकूणच अंदाज आहे…
पण खरी मेख आहे ती इथेच… करंट एमएलए मुक्ती मोहम्मद इस्माईल यांना प्रत्येक टर्मला घासून लढत देणारे आसिफ शेख यांनी 2019 ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली… मात्र त्यात त्यांचा पराभव झाला… यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली… राष्ट्रवादीच्या फुटीतही मालेगाव मध्यच धार्मिक राजकारण लक्षात घेत ते शरद पवार गटासोबतच राहिले… खरंतर मालेगाव मध्यची ताकद पाहता ते राष्ट्रवादीकडून धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते… पण ही जागा काँग्रेसची असल्याने त्यांनी दोन पावलं मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला… मतदारसंघातून आश्चर्यकारक सव्वा लाखाचं लीड दिलं… पण आता आघाडीत मालेगाव मध्यची जागा काँग्रेसला सुटणार हे लक्षात येताच आसिफ शेख यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली… त्यामुळे काँग्रेस – भाजप – एमाआयएम आणि अपक्ष अशी चौरंगी लढत आगामी विधानसभेत मालेगाव मध्य मध्ये पाहायला मिळू शकते… आसिफ शेख यांनी खरंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेस सोबतची आपली निष्ठा कायम ठेवली होती… खरंतर काँग्रेसमध्येच त्यांनी राजकारणाची बाराखडी गिरवली.. नगरसेवक महापौर ते थेट आमदारही झाले… मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख या नावाला मानणारा मोठा व्होट बेस देखील आहे… त्यामुळे लढत चौरंगी असली तरी मुख्य लढत मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख आशीच राहील, एवढं मात्र नक्की…
बाकी यंत्रमागाचं शहर असूनही टेक्स्टाईल पार्कला चालना न मिळणं, शहरातील अस्वच्छता, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक यांसारखे अनेक समस्या येणाऱ्या निवडणुकीला फ्रंटला असू शकतात… दहा वर्षाच्या काळात आमदार रशीद शेख यांनी केलेली विकासकामं धार्मिकतेच्या मुद्यापुढे फिकी पडली. याच काळात मालेगाव मध्यमधील मतदार संघाचे विभाजन होऊन हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला. त्यामुळे कॉंग्रेसची हक्काच्या हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका आमदार रशीद शेख यांना बसला. 2014 साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. उच्च शिक्षित असलेल्या आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलेसे केले. तर दुसरीकडे दखनी-मोमीन अशी जातीय पेरणी होऊ लागली. यंत्रमाग उद्योगाला सवलती, मुस्लीम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला.
त्यामुळे 2014 सालच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले. आपल्या आमदारकीच्या काळात आसिफ शेख यांनी विविध समाजपयोगी कामांचा धडाका लावला. त्यातच त्यांनी स्थानिकांना रोजगार देत तयार केलेल्या मालाची सर्वत्र ओळख व्हावी म्हणून मालेगाव महोत्सवांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करत जनतेशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मालेगाव मध्यचा कौल हा विकासाभिमुख राजकारणाला राहील की धार्मिक कट्टरतावादाला राहील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच… बाकी तुम्हाला काय वाटतं, मालेगाव मध्यचा 2024 चा आमदार कोण? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा..