कोल्हापुरात काँग्रेसला धक्का …! कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर… पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच काल दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मात्र याचवेळी कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठ्या धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी झालेलया पाहायला मिळाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असतानाच अचानक उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरिमाराजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर मात्र सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली…

कोल्हापूर म्हणजे काँग्रेचा बालेकिल्ला मानला जातो. वर्षानुवर्ष कोल्हापूरमध्ये काँग्रेसची पकड मजबूत आहे असं असताना आधीच राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाल्यामुळे यंदाच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय निकाल लागेल याची उत्सुकता असतानाच अचानक कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसच्या मधून राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. खरंतर पक्षातील वरिष्ठांनी आधी उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली त्यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. माधुरिमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज देखीलदाखल केला होता. मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या समोर सतेज पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली. यावेळी ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले ” दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “जर लढायचं नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती मी माझी ताकद दाखवली असती” अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अर्ज मागे घेऊन मधुरिमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या समोरच” हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे चालणार नाही. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज… हे मला मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती” असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तसाच शाहूंच्या समर्थकांना सतेज पाटलांनी ” हे अजिबात बरोबर नाही तुम्ही जेवढ्यानी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला.

सतेज पाटलांना अश्रू अनावर …

दरम्यान मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची बातमी तोपर्यंत सर्वत्र पसरली होती. यानंतर अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर सतेज पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांशी बोलत असताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. “माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहीत नाही. जे काय झालं ते तुमच्या समोर आहे,” असं म्हणत भाषणाला सुरुवात केल्यानंतर सतेज पाटील यांचा कंठ दाटून आला. त्यानंतर त्यांनी माईक खाली ठेवत ते खाली बसले आणि डोळे पुसू लागले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने उठून कार्यर्त्यांची गर्दी पाहून आणि पाठिंबा पाहून सतेज पाटलांच्या डोळ्यात आश्रू आल्याचं सांगत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. “जे काही घडलं त्यावर मी आज काही टीका-टीप्पणी करणार नाही. मात्र जे घडलं त्याला समोरे जाण्याचं समर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे,” असं सतेज पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.