Asteroid | आपली आकाशगंगा खूप मोठी आहे. तसेच अनेक रहस्यांनी देखील भरलेली आहे. परंतु त्यासोबत अनेक धोक्याचे संकेत देखील वेळोवेळी पृथ्वीवर येत असतात. अशातच एका भयानक संकटाची चाहूल लागलेली आहे. हे एक मोठे संकट 24 सप्टेंबर 2182 मध्ये येणार असल्याची माहिती आलेली आहे. हे संकट एका लघुग्रहाच्या रुपाने पृथ्वीवर येणार आहे. त्यामुळे सगळे वैज्ञानिक काळजीत आहेत.
पृथ्वीला कसे वाचवता येईल? | Asteroid
हाती आलेल्या माहितीनुसार पृथ्वीला एका मोठ्या लघुग्रहापासून धोका आहे. अशाच एका लघुग्रहामुळे पृथ्वीवरील संपूर्ण डायनासोरच्या प्रजाती नष्ट झालेल्या होत्या. येत्या काळात हा लघुग्रह जर पृथ्वीवर धडकला, तर सजीवाच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. असे देखील सांगण्यात आलेले आहे. पृथ्वीवर महाप्रयलकारी त्सुनामी येईल अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे.
हा लघुग्रह 169 वर्षानंतर पृथ्वीला धडकणार आहे. पण तरी देखील त्याचा धोका कसा टाळता येईल? याबाबतची संशोधन नासामध्ये चालू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नासाने पृथ्वीला कितपत धोका होऊ शकतो? त्यामुळे काय होईल? याबाबतची शंका व्यक्त केलेली आहे. दर सहा वर्षांनी बेनू हा लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून जातो. परंतु येणाऱ्या काही काळामध्ये हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असल्याची माहिती आलेली आहे.
22 अणुबॉम्बप्रमाणे शक्तिशाली
बेनू हे या लघुग्रहाचे (Asteroid) नाव आहे. 169 वर्षानंतर हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. त्यामुळे पृथ्वीचा अंत होण्याचे संकेत देखील येत आहेत. हा लघु ग्रह 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर असणार आहे. जो पृथ्वीचा विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. हे संशोधन झाल्यापासून सगळेच नासाचे संशोधक याबाबत काळजी व्यक्त करत आहे..आणि पृथ्वीला या महाभयानक संकटातून कसे वाचवता येईल? याबाबतचे संशोधन देखील चालू आहे.