Asteroid | अंतराळामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक ग्रह, तारे, उल्का यासोबत इतरही गोष्टी असतात. त्याबद्दल आपल्याला फारसी माहिती नसते. अंतराळात लहान-मोठे आकाराचे अनेक उल्का देखील असतात. हे ग्रह आणि उल्फापिंड असतात. हे ग्रह अंतराळात सर्वत्र फिरत असतात. कधी कधी या सगळ्यांची एकमेकांसोबत टक्कर देखील होत असते. याबाबत आपण अनेक बातम्या ऐकलेल्या आहेतच. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक संकट येताना दिसत आहे. ते म्हणजे पृथ्वीच्या दिशेने एक मोठा लघुग्रह पुढे येताना दिसत आहे.
हा एक मोठा लघुग्रह (Asteroid) आहे. तो पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकवताना दिसत आहे. तो जर पृथ्वीला धडकला तर त्याच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. लघुग्रहाचा आकार हा विमानाएवढा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा लघुग्रह जर पृथ्वीच्या जवळ आणखी आला, तर पृथ्वीची आणि त्या लघुग्रहाची टक्कर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने याबाबतची ही माहिती दिलेली आहे.
नासाने दिली मोठी माहिती | Asteroid
नासाने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक मोठा लघुग्रह पुढे येत आहे. या लघुग्रहाचा आकार देखील खूप मोठा आहे. अगदी दोन विमाने यात मावतील एवढा मोठा आकार आहे. नासाने या ग्रहाला 2024 FH 2 असे नाव दिलेले आहे. हा लघुग्रह 3.8 ML अंतरावर येऊन जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीला आदळण्याचा धोका जास्त नाही. असे देखील सांगण्यात आलेले आहे.
लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास काय होईल?
याआधी 65 दशलक्ष वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. ज्यामुळे पृथ्वीवरील सगळे डायनासोर नष्ट झाले होते, असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्याआधी डायनासोरचे राज्य होते. त्या एका लघुग्रहामुळे सगळे काही नष्ट झालेले होते. त्यामुळे पुन्हा जर एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला, तर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू शकते. आणि संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊ शकते, असे देखील सांगण्यात आलेले आहे.
अंतराळातील घटनांवर नासाचं लक्ष
याआधी घडलेली ही घटना पुन्हा पृथ्वीवर घडू नये. यासाठी नासाचे पृथ्वीवरील लघुग्रहकडे खूप लक्ष असते. प्रत्येक घडामोडीवर त्यांचे लक्ष असते, जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली, तर ते लघुग्रह पृथ्वीवर आढळण्याची दिशा अंतराळाद्वारे वळवली जाऊ शकते.