Asus च्या ‘या’ Mobile मध्ये मिळतायत AI फीचर्स; किंमत किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बाजारात असे अनेक नवीन प्रॉडक्ट येत आहेत ज्यामध्ये AI चे फिचर ऍड केले जात आहेत. त्यातच आता प्रसिद्ध मोबाईल कंपनी Asus ने AI फीचर्ससह नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Asus ROG Phone 8 असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्तम गेमिंगचा अनुभव सुद्धा मिळेल. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलचे अन्य खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत ….

लास व्हेगासमध्ये सुरू असलेलया कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (CES) मध्ये Asus ने हा मोबाईल लाँच केला आहे. Asus ROG Phone 8 आणि ROG Phone 8 Pro या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला AI चा वॉलपेपर ठेवता येणार आहे. या फोनमध्ये बॅक कव्हरजवळचं मेटल और SoC च्या मध्ये राहून काम करणारे 360 डिग्री SoC कूलिंग सिस्टीम (जेन 2) देण्यात आलं आहे. मोबाईल मध्ये 6.78 इंचाचा फुल HD+ AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेट आणि 2500 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट बसवली आहे.

24GB पर्यंत रॅम

कोणताही मोबाईल घेताना आपण त्याची आधी RAM आणि ROM पाहतो. जेणेकरून आपल्याला त्यामध्ये अधिक डेटा इन्स्टॉल करता येईल. त्याचप्रमाणे ही बाब डोळ्यासमोर ठेऊन Asus ROG Phone 8 मध्ये एकूण 24GB पर्यंतची LPDDR5X रॅम आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Asus ROG Phone 8 ला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 32 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. Asus ROG Phone 8 मध्ये कंपनीने 5500mAh ची बॅटरी दिली असून ही बॅटरी 65W चार्जरला सपोर्ट करते. या फोनमध्ये क्विक चार्ज 5.0, PD चार्जिंग आणि 15W Qi वायरलेस चार्जिंग आहे.

मोबाईलची किंमत किती?

Asus ROG Phone 8 या मोबाईलच्या 16GB RAM/256GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत $1099.99 पासून म्हणजेच भारतीय किमतीत सुमारे ₹91,500 पासून सुरू आहे. तर ROG Phone 8 Pro च्या 24GB RAM/1TB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत $1499.99 जी की भारतीय किंमतीत सुमारे ₹1,25,000 एवढी आहे.