Atal Bamboo Farming Yojana | आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून असते. त्यामुळे सरकार देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यांना त्यातून चांगली शेती करता येते. अशातच शासनाने आणखी एक योजना राबवलेली आहे. याची माहिती अनेकांना नाही. परंतु या योजनेतून शेती करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळत असते. सरकारच्या या योजनेचे नाव अटल बांबू समृद्धी योजना (Atal Bamboo Farming Yojana ) असे आहे. ही योजना महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागातर्फे बांबू लागवडीसाठी राबवली जाते.
या योजनेअंतर्गत (Atal Bamboo Farming Yojana ) शेतकऱ्यांना या योजनेतून रोप आणि मजुरीच्या रूपात लाभार्थ्यास 3 वर्षापर्यंत 6 लाख 90 हजार रुपयांपर्यंतच्या अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, गे या योजनेमागील सरकारचे उद्दिष्ट आहे. बांबू लागवडीसाठी सध्याचे पावसाळ्याचे वातावरण हे अत्यंत पोषक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे. त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा. जेणेकरून बांबू लागवड करण्यासाठी त्यांना सरकारकडून अर्ज मिळेल. यासाठी रोजगार हमी योजनेतून तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर रोजगार हमी योजनेकडून तुमची अंतिम निवड केली जाईल.
यावर्षी वनविभागाने बांबूची जवळपास 14 लाख 67 हजार 50 विविध प्रकारची रोपे तयार केलेली आहे. ही रोप 15 रोपवाटिकांमध्ये तयार करण्यात आलेली आहे. आणि अत्यंत सवलतीच्या दराने ही रोपे सध्या विकली जात आहे. सरकारच्या या अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून बांबू लागवड करता येते. यामध्ये वैयक्तिक शेतकरी शेतकरी उत्पादित कंपन्या आणि संस्था समूह अर्ज करू शकतात. तसेच शासकीय जमिनीवर देखील तुम्ही ही बांबूंची लागवड करू शकता.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागद | Atal Bamboo Farming Yojana
या योजनेचा अर्ज करताना तुम्हाला तुमच्या अर्जासोबत आधार कार्ड, शेतकरी असल्याचा सातबारा उतारा, आठ अ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.